
सरकारने सांगितले की पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी सिबिल स्कोर बंधनकारक राहणार नाही.
बँकांना फक्त सिबिल स्कोरच्या आधारे कर्ज नाकारता येणार नाही; मात्र अर्जदाराची सखोल चौकशी होईल.
ग्राहकांना दरवर्षी एकदा मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळण्याचा अधिकार आहे.
CIBIL Score: सणासुदीच्या काळात कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांकडे क्रेडिट हिस्ट्री किंवा CIBIL स्कोर नसला, तरी त्यांना बँक व एनबीएफसीकडून कर्ज मिळू शकणार आहे. सरकारने सांगितले की, कर्ज मंजुरीसाठी CIBIL स्कोर बंधनकारक नाही.