
नेस्लेचे सीईओ लॉरेंट फ्रेक्स यांना ऑफिसमधील लव्ह अफेअरमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला.
कंपनीच्या तपासात त्यांनी नैतिक नियम आणि कोड ऑफ बिझनेस कंडक्टचा भंग केल्याचं उघड झालं.
कुठलीही नुकसान भरपाई न देता त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
Nestle CEO Love scandal: जगप्रसिद्ध FMCG कंपनी नेस्लेमध्ये खळबळ उडाली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लॉरेंट फ्रेक्स यांना त्यांच्या ऑफिसमधील प्रेमसंबंधामुळे CEO पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कंपनीच्या मते, फ्रेक्स यांनी कंपनीच्या कोड ऑफ बिझनेस कंडक्टचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.