

Old Monk rum labelling dispute: FSSAI has proposed that the product be labelled “Rum-like” instead of “Rum.”
esakal
मुंबई : लोकप्रिय मद्य ब्रँड ‘Old Monk’ च्या विक्री आणि उत्पादनाच्या लेबलिंगवरून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आणि उत्पादक कंपनी मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान FSSAI ने आपली भूमिका स्पष्ट करत कंपनीने उत्पादनाच्या लेबलवर ‘Rum’ ऐवजी ‘Rum-like’ अर्थात ‘रमसारखे’ असा उल्लेख करण्यास सहमती दर्शवल्यासच विक्रीला परवानगी देण्याची तयारी दर्शवली. महाराष्ट्रातील विक्रीवरील निर्बंधांमुळे कंपनीला ५०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.