देशातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ (ONORC) योजनेअंतर्गत रेशन वितरण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून, आता लाभार्थ्यांना संपूर्ण धान्य एकाच रेशन दुकानातून घेण्याची सक्ती राहणार नाही.