
केंद्र सरकारच्या ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 मुळे ड्रीम 11 ने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व सोडले.
ड्रीम 11 ने 2023 मध्ये बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा करार केला होता, जो आता संपुष्टात आला आहे.
आशिया कप 2025 जवळ आल्याने बीसीसीआयसमोर तातडीने नवीन प्रायोजक शोधण्याचे आव्हान आहे.
Online Gaming Bill 2025: केंद्र सरकारने नुकतेच ‘ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025’ मंजूर केले असून, त्यानंतर फॅन्टसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम 11 ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवले आहे की, ते टीम इंडियाचे टायटल स्पॉन्सर म्हणून करार पुढे सुरू ठेवणार नाहीत.
या नवीन कायद्यामुळे रिअल मनी गेमिंग सेवा आणि त्यावरील जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फॅन्टसी स्पोर्ट्स कंपन्यांच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे.