Paytm Payments Bank: 15 मार्चनंतर पेटीएमच्या कोणत्या सेवा होणार बंद? पहा संपूर्ण यादी

Paytm Payments Banks Deadline: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे. RBI च्या निर्देशानुसार, 15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवर कोणतेही व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत.
Paytm Payments Bank deadline List of services that will work and not after March 15
Paytm Payments Bank deadline List of services that will work and not after March 15Sakal

Paytm Payments Banks Deadline (Marathi News): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे. RBI च्या निर्देशानुसार, 15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट बँकेवर कोणतेही व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, बँकेने ग्राहकांना पेटीएम पेमेंट बँकेत असलेली रक्कम इतर कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा सल्ला दिला आहे.

पेटीएम वापरकर्त्यांसाठी अडचणी वाढू शकतात कारण 15 मार्च 2024 नंतर वापरकर्त्यांना 8 सेवांचा लाभ मिळणार नाही.

पेटीएम पेमेंट बँकेच्या काही सेवांवर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यासाठी एक अंतिम मुदत देखील निश्चित करण्यात आली होती आणि ती तारीख जवळ आली आहे. 15 मार्चनंतर, वापरकर्ते पैसे परत करणे, पैसे काढणे यासह अनेक सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत, 15 मार्चपासून पेटीएम पेमेंट बँकेच्या कोणत्या सेवा उपलब्ध असणार नाहीत ते जाणून घेऊया.

Paytm Payments Bank deadline List of services that will work and not after March 15
Indian Economy: 7 वर्षानंतर प्रत्येक भारतीय सरासरी इतके पैसे कमवणार; 7 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार

15 मार्चनंतर या 8 सेवा बंद होतील

1. फास्टॅगचा वापरही बंद होणार आहे. जोपर्यंत शिल्लक रक्कम आहे तोपर्यंत वापरकर्त्यांना पेटीएम फास्टॅग वापरण्याचा पर्याय मिळेल. यानंतर, वापरकर्त्याला फास्टॅगमध्ये पैसे भरण्याचा पर्याय मिळणार नाही.

2. पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्त्यांसाठी वॉलेट सेवा बंद केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना त्यांच्या वॉलेटचे पैसे इतर कोणत्याही बँक खात्यात हस्तांतरित करण्याची सुविधा मिळेल.

3. पेटीएम पेमेंट्स बँकिंग सेवेअंतर्गत, वापरकर्ते UPI किंवा IMPS द्वारे पैसे काढू शकतील, परंतु 15 मार्च नंतर, तुम्हाला दुसऱ्या बँकेतून व्यवहार करावे लागतील. याशिवाय, इतर सेवा आहेत ज्या पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्ते घेऊ शकणार नाहीत.

4. बँक खात्यासाठी टॉप-अप सेवा

5. पेटीएम बँकेत दुसऱ्या बँक खात्यातून पैसे मिळणे

6. डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर

7. पगार ट्रांसफर करणे

8. पेटीएम फास्टॅग बॅलन्स इतर फास्टॅगवर ट्रान्सफर करण्याची सुविधा

Paytm Payments Bank deadline List of services that will work and not after March 15
NBFC License: सात NBFC कंपन्या बाजारातून बाहेर; कंपन्यांनी RBIला नोंदणी प्रमाणपत्रे केली परत, काय आहे कारण?

'या' सेवा पेटीएमवर 15 मार्चनंतरही सुरू राहतील

  • पैसे काढणे- तुम्ही पेटीएम पेमेंट बँक खात्यातील सध्याचे पैसे काढू शकाल.

  • वॉलेट मनी- पेटीएम पेमेंट्स बँक वापरकर्ते वॉलेटमधील पैसे देखील काढू शकतील.

  • कॅशबॅक- कॅशबॅक रक्कम वापरकर्त्यांच्या खात्यात राहील.

  • रिफंड- रिफंड पैसे देखील बँक खात्यात असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com