Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Petrol Diesel Price Update: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर इंधनाच्या किमतींबाबत सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Petrol Diesel Price Prediction

Crude Oil Prices Rise, Will Petrol and Diesel Become Costlier in India? Government update 

eSakal

Updated on: 

will petrol price increase in India: जागतिक स्थरावर पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव, होर्मुज सामुद्रधुनीतील संकटामुळे आणि यूक्रेनच्या रशियातील ऑइल रिफायनरी वरील हल्ल्यांमुळे गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने मोठी उसळी घेतली. क्रूड ऑइलचा भाव 100 ते 115 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला असतानाही भारतात पेट्रोल-डिझेल महागणार का असा प्रश्न ग्राहकांना लागून होता. याबाबत आता अपडेट आली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com