

Petrol Prices to Fall? Government Waives Excise Duty on High-Ethanol Fuel
eSakal
Petrol Excise Duty News: केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार 22 ते 30 टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलवर (E22, E25, E27 आणि E30) आता कोणतेही उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) आकारले जाणार नाही. या उच्च इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे.