
PF Trust in Trouble: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) तब्बल 87 हजार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) गुंतवणुकीवर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून जमा केलेले अंदाजे 1240 कोटी रुपये पीएफ ट्रस्टकडे न भरल्यामुळे जवळपास 100 कोटी रुपयांच्या व्याजाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.