Man Industries (India) Ltd : पाईप कंपनीचा शेअर एका वर्षात 150% वाढला, आणखी 27% वाढ अपेक्षित...

Man Industries (India) Ltd Stock Analysis : चांगल्या बिझनेस फंडामेंटल्समुळे आणि कंपनीच्या पूर्वी जाहीर केलेल्या विस्तार योजनांच्या अंमलबजावणीमुळे स्टॉकची किंमत अलीकडे दुप्पट झाली
pipe company shares up 150 percent in one year another 27 percent expected
Man Industries (India) Ltdesakal

पाईप उत्पादक मान इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये नुकतीच 7 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. मात्र नंतर ही वाढ काहीशी कमी झाली. ब्रोकरेज फर्म एमकेने स्टॉकसाठी कव्हरेज सुरू केले आहे. ब्रोकरेजने 'बाय' रेटिंगसह प्रति शेअर 500 रुपयांचे टारगेट दिले आहे.

27 जूनला शेअरच्या बंद किमतीपेक्षा हे सुमारे 27 टक्के अधिक आहे. शुक्रवारी सकाळी बीएसईवर मान इंडस्ट्रीजचे शेअर्स 408.90 रुपयांच्या वाढीसह उघडले. दिवसभरात ते मागील बंद किमतीपेक्षा 7 टक्क्यांनी वाढले आणि 422.95 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले.

चांगल्या बिझनेस फंडामेंटल्समुळे आणि कंपनीच्या पूर्वी जाहीर केलेल्या विस्तार योजनांच्या अंमलबजावणीमुळे स्टॉकची किंमत अलीकडे दुप्पट झाली आहे असे एमकेने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे. गेल्या 12 महिन्यांत मान इंडस्ट्रीजचे शेअर्स जवळपास 150% वाढले आहेत. मान इंडस्ट्रीज मोठ्या व्यासाच्या कार्बन स्टील पाईप्सचे मान्युफॅक्चरिंग आणि कोटिंग, इंफ्रास्ट्रक्चर आणि रियल्टी आणि व्यापारात गुंतलेली आहे.

pipe company shares up 150 percent in one year another 27 percent expected
Stock Investment : 'हा' शेअर दुप्पट करेल तुमची गुंतवणूक, कोणता आहे 'हा' शेअर ?

प्रोजेक्ट एग्झिक्युशनमुळे पुढील 3-4 वर्षांत कंपनीचा महसूल दुप्पट होऊ शकतो. मान इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडची स्थापना 1988 करण्यात आली होती. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 2671.62 कोटी आहे. आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 825.02 कोटीची कंसोलिडेटेड विक्री नोंदवली आहे, मागच्या तिमाहीतल्या 847.37 कोटीच्या विक्रीपेक्षा ती 2.64 % घसरली आहे.

pipe company shares up 150 percent in one year another 27 percent expected
Navi Mutual Fund : फंड निवडीत परताव्याला प्राधान्य; नवी म्युच्युअल फंडाचा अहवाल

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com