

PM Kisan Samman Nidhi: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याची शक्यता आहे. या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतील. सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे.