
PM Kisan Yojana : आठवडा उलटला तरी PM किसान योजनेचा हफ्ता जमा झाला नाही?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल आणि एका आठवड्यानंतरही खात्यात 2 हजार रूपये आले नाहीत. तर काय करायचे हे आज पाहूयात.
पीएम किसान योजनेबाबत ई-केवायसी, आधार सीडिंग, लँड सीडिंग न केल्यास तुमची रक्कम अडकण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम या योजनेच्या pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन ही सर्व प्रक्रिया पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार तुमचे नाव क्लिअर करेल. आणि पुढील हप्त्यासोबत सर्व पैसे खात्यात जमा केले जातील.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते, आधार क्रमांकाची माहिती नीट न भरल्यामुळे तुमचे पैसेही अडकून पडतात. आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in नक्की भेट द्या. माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्त करा.
-
pmkisan.gov.in वेबसाईटवर जा.
- पेजवर उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर असे लिहीलेले असेल. त्यावर क्लिक करा.
- तिथे बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल.
- आधार क्रमांक टाका आणि डेटा मिळविण्यावर क्लिक करा.
- प्रक्रियेत तुमची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल.
- जर तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही तो दुरुस्त करू शकता.
तरीही पैसे आले नाहीत तर…
लाभार्थी यादीत समाविष्ट करूनही तुमच्या खात्यात 2 हजार रुपये न मिळाल्यास. 13 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नसल्यास, तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. इथेही तुमची प्रत्येक समस्येचे निरसन केले जाईल.