Small Saving Scheme: 10 लाख जमा केल्यास व्याजातून मिळतील 4 लाख; कोणती आहे ही योजना?

Small Saving Scheme: पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना हा ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये चांगल्या परताव्या शिवाय तुमचे पैसे पुर्णपणे सुरक्षित राहतात. यातील गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही.
Small Saving Scheme
Small Saving SchemeSakal

Small Saving Scheme: पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना हा ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये चांगल्या परताव्या शिवाय तुमचे पैसे पुर्णपणे सुरक्षित राहतात. यातील गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, ही योजना वार्षिक 8.2 टक्के व्याज देते.

या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. 1000 रुपयांच्या पटीत पैसे गुंतवता येतात. यामध्ये जास्तीत जास्त 30 लाखांची गुंतवणूक करता येते. पण यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेत (Senior citizen scheme) 5 लाखांची एकरकमी गुंतवणूक केल्यास, 8.2 टक्के वार्षिक व्याज दराने (चक्रवाढ), 5 वर्षानंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 14 लाख 10 हजार होईल. इथे तुम्हाला व्याजातून 4 लाख 10 हजारांचे उत्पन्न मिळेल. अशा प्रकारे, प्रत्येक तिमाहीचे व्याज 20 हजार 500 असेल.

पोस्ट ऑफिसच्या SCSS अंतर्गत, 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती यात खाते उघडू शकते. जर एखाद्याचे वय 55 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल पण 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने VRS घेतले असेल तर तो ही या SCSS योजनेत खाते उघडू शकतो.

पण अट अशी आहे की त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत हे खाते उघडावे लागेल आणि त्यात जमा केलेली रक्कम ही सेवानिवृत्तीच्या लाभाच्या रकमेपेक्षा जास्त नसावी.

Small Saving Scheme
RBI Alert: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! 1 एप्रिलला 2,000च्या नोटा बदलता येणार नाहीत; काय आहे कारण?

या योजनेत, ठेवीदार त्याच्या पत्नी/पतीसोबत वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतो. पण एकत्रितपणे घेतलेली कमाल गुंतवणुकीची मर्यादा 30 लाखापेक्षा जास्त असू शकत नाही.

सीनिअर सिटीझन सेविंग्‍स स्‍कीम्‍समध्ये खाते मुदतपूर्व बंद करू शकतात. पण खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर बंद केले तर पोस्ट ऑफिस ठेवीतून 1.5 टक्के कपात करेल, जर 2 वर्षानंतर बंद केल्यास ठेवीतील 1 टक्के रक्कम कापली जाईल. मॅच्युरिटीनंतर खाते आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते. यासाठी मुदतपूर्ती तारखेपासून एक वर्षाच्या आत अर्ज द्यावा लागेल.

खाते उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळी नामांकन सुविधा (Nomination Facility) उपलब्ध आहे. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते. यामध्ये 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. तर व्याज उत्पन्नावर कर आकारला जातो.

Small Saving Scheme
Crypto Fraud: 'क्रिप्टो किंग' सॅम बँकमन-फ्राइडला कोर्टाने का सुनावली 25 वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com