

Government-Backed Post Office Scheme for Risk-Free Returns Explained
eSakal
Post Office Investment Plan : भारतातील बहुतांश गुंतवणूकदार आणि सामान्य लोक आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक करताना सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देतात. जास्त धोका पत्करण्यापेक्षा कमी परतावा मिळाला तरी चालेल, पण भांडवल सुरक्षित राहावे आणि नियमित उत्पन्न मिळत राहावे, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे अनेक जण पारंपरिक बँक मुदत ठेवीकडे (FD) वळतात. मात्र, बँक एफडीशिवाय पोस्ट ऑफिसच्या काही बचत योजना देखील गुंतवणूकदारांना स्थिर आणि खात्रीशीर परतावा देतात विशेष म्हणजे काही योजनेतील व्याज हे इतरांच्या तुलनेत जास्त आहे. शिवाय यामध्ये सरकारी हमी असल्यामुळे जोखीम अत्यंत कमी असते.