

Post Office NSC Scheme 2026: Invest ₹10 Lakh, Earn Around ₹4.49 Lakh Interest in 5 Years
eSakal
5-Year Post Office Scheme, Interest Rate, Returns and Tax Benefits Explained: आपल्याला गुंतवणूक करताना शेअर बाजारातील चढ-उतारांची जोखीम टाळून बचत करायची असेल, तर पोस्ट ऑफिसच्या काही योजनांचा विचार करता येतो. कारण गुंतवणुकीत सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळावा, अशी अनेकांची अपेक्षा असते. अशा योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर सरकारने निश्चित केलेल्या व्याजदरानुसार परतावा मिळतो. यापैकीच एक योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC). पाच वर्षांसाठी पैसे गुंतवण्याचा पर्याय शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.