PPF Account Rules: एक व्यक्ती किती PPF खाती उघडू शकते? काय आहे मर्यादा? जाणून घ्या नियम

पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहेच, परंतु त्यापूर्वी त्याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
PPF Account Rules
PPF Account RulesSakal

PPF Account Rules: आजच्या काळात बचत खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हालाही गुंतवणुकीद्वारे मोठी बचत करायची असेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

पण तुम्हाला माहिती आहे का की गुंतवणूकदार किती पीपीएफ खाती उघडू शकतो आणि याबाबत काय नियम आहेत. आज आपण त्याबद्दल येथे सविस्तर माहिती घेणार आहोत.

पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के दराने व्याज मिळते. PPF वर उपलब्ध असलेला हा व्याजदर जुलै-सप्टेंबर तिमाहीत 8 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत, पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आहे, परंतु त्यापूर्वी त्याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

PPF खाते कोण उघडू शकते?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, लहान बचत योजनांमधील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे. कोणताही भारतीय रहिवासी स्वतःच्या नावाने उघडू शकतो.

तसेच पालकांपैकी एक अल्पवयीन मुलासाठी किंवा मुलीसाठी पीपीएफ खाते उघडू शकतो. दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास, आजी-आजोबा नातवंडांचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकतात.

एखादी व्यक्ती किती पीपीएफ खाते उघडू शकते?

PPF नियमांनुसार, एखादी व्यक्ती फक्त एक PPF खाते उघडू शकते. कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी नाही. पीपीएफचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफ खाती उघडतात.

PPF Account Rules
Elon Musk: इलॉन मस्कला मोठा धक्का! ट्विटरवर 2,000 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा; काय आहे प्रकरण?

PPF खात्याचे नियम काय आहेत?

जर पीपीएफ खातेधारकाने आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्याच्या खात्यात किमान 500 रुपये जमा केले नाहीत, तर डिफॉल्ट म्हणून प्रति वर्ष 50 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच पीपीएफ खात्याचा गुंतवणूक कालावधी 15 वर्षे निश्चित केला जातो.

गुंतवणूकदार 7 व्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी एकदा पैसे काढू शकतात, परंतु ही रक्कम 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. तसेच, PPF गुंतवणुकीसाठी किमान ठेव रक्कम 500 रुपये प्रति वर्ष आणि कमाल मर्यादा रुपये 1,50,000 आहे.

PPF Account Rules
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com