
पोस्ट ऑफिसची PPF योजना सुरक्षित गुंतवणूक आणि हमखास परताव्यासाठी लोकप्रिय आहे.
वार्षिक 7.1% टॅक्स फ्री व्याज, 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी मिळतो.
दरवर्षी 1.5 लाख गुंतवणुकीतून मॅच्युरिटीवेळी 40 लाखांहून अधिक फंड तयार होऊ शकतो.
Post Office Saving Schemes: प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही हिस्सा बचत करून अशा ठिकाणी गुंतवायचा असतो, जिथे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला परतावा मिळेल. अशावेळी पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजना गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यापैकी सर्वाधिक पसंतीची योजना म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF). ही योजना कमी जोखीम, टॅक्स फ्री आणि आकर्षक व्याजदरामुळे विशेष लोकप्रिय आहे.