
Trump-Musk Breakup: डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील मैत्री आता तुटली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जोरदार समर्थक असलेले 'फर्स्ट बडी' इलॉन मस्क आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेले आहेत. इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरही टीका केली आहे आणि महाभियोगालाही पाठिंबा दिला आहे. मस्क यांनी असेही म्हटले आहे की ट्रम्प यांच्या या धोरणामुळे मंदी येईल.