
Loan against shares
Sakal
RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून, गुंतवणूकदार आता लिस्टेड शेअर्स तारण ठेवून ₹ 1 कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकतील. याआधी ही मर्यादा फक्त ₹ 20 लाख होती. इतकेच नाही, तर IPO फाइनान्सिंगची मर्यादाही ₹ 10 लाखांवरून ₹ 25 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही घोषणा RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीनंतर केली.