

RBI Cancels License of 52-Year-Old Mumbai Co-Operative Bank; What Happens to Depositors’ Money?
esakal
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील सर्वोदय सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भांडवलाची कमतरता आणि भविष्यातील उत्पन्नाची अनिश्चितता यासारख्या कारणांमुळे ही बँक नियमानुसार चालवणे शक्य नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदी पाळण्यात बँक अपयशी ठरल्याने आणि ठेवीदारांच्या हिताला धक्का बसू शकल्याने तात्काळ प्रभावाने बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.