RBI Fines ICICI, Axis, and 3 Other BanksSakal
Personal Finance
RBI Action: ICICI पासून ते अॅक्सिस बँकेपर्यंत... आरबीआयने घेतला मोठा निर्णय; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
RBI Fines ICICI, Axis, and Other Banks: नियम न पाळल्यामुळे मध्यवर्ती बँकेने आयडीबीआय बँक लिमिटेडला 31.8 लाख रुपये आणि बँक ऑफ महाराष्ट्रला 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
RBI Fines ICICI, Axis, and Other Banks: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितले की त्यांनी ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदासह चार बँकांना दंड ठोठावला आहे. बँकांमधील सायबर सुरक्षा, नो युवर कस्टमर (केवायसी) आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारी करण्याशी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने आयसीआयसीआय बँकेला 97.80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

