RBI Imposes Penalty : आरबीआयची मोठी कारवाई, 'या' बँकेला ठोठावला 30 लाखांचा दंड, काय आहे प्रकरण

याच महिन्यात आरबीआयने सहकारी बँकेलाही दंड ठोठावला आहे
RBI Imposes Penalty
RBI Imposes Penalty Sakal

RBI Imposes Penalty : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने करूर वैश्य बँकेवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल करूर वैश्य बँकेला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी करूर वैश्य बँकेचे शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले.

बीएसई निर्देशांकावर शेअरची किंमत 97.65 रुपये होती :

RBI म्हणाले की केंद्रीय रिझर्व्ह बँकेने निवेदनात सांगितल्या प्रमाणे 21 मार्च 2023 रोजीच्या आदेशात करूर वैश्य बँक लिमिटेडवर 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI imposes Rs 30 lakh penalty on Karur Vysya Bank for rule violations)

बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे फसवणूक-वर्गीकरण आणि अहवाल) निर्देश, 2016 च्या काही तरतुदींचे पालन केले नाही.

RBI Imposes Penalty
LPG Subsidy : उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, केंद्र सरकारने...

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, करूर वैश्य बँकेला नोटीस बजावण्यात आली आहे ज्यामध्ये मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्यावर दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. बँकेने नोटीसला दिलेल्या उत्तराचा विचार करून ही कारवाई करण्यात आली आहे.

डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत, करूर वैश्य बँकेला ₹ 289 कोटी नफा झाला होता. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ही 56 टक्के वाढ आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 185 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI ) एचडीएफसी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Housing Development Finance Corporation-HDFC) वर राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या काही तरतुदी पूर्ण न केल्याबद्दल पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

RBI Imposes Penalty
एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com