

RBI Plans Big UPI Change! Transfers Above ₹10,000 May Be Delayed
eSakal
RBI UPI Payment Rule: भारतीय रिझर्व्ह बँक सध्या ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल सुचविले आले, ज्यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांची आर्थिक सुरक्षा यातून साध्य होईल. यातच आता डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी, RBIने 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी नवीन सुरक्षा उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. हा प्रस्ताव विशेषतः ऑथोराइज्ड पुश पेमेंट्स (APPs) शी संबंधित वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे.