
RBI MPC Meet Outcome: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) भारतासोबत व्यापार करणाऱ्या देशांमध्ये रुपयाचा विस्तार करण्याची योजना जाहीर केली आहे. RBI चा उद्देश म्हणजे नेपाल, भूतान आणि श्रीलंकेसारख्या देशांमध्ये भारतीय बँका थेट रुपयात कर्ज देऊ शकतील, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात रुपयाचा वापर वाढेल आणि व्यवहार अधिक सुलभ होतील.