
RBI Penalty on SBI: नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी बँका आणि NBFC वर दंडात्मक कारवाई करत असते. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने इंडियन बँकेला दंड ठोठावला होता. यावेळी रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि जन स्मॉल फायनान्स बँकेला नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. काही त्रुटींमुळे बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.