
RCB for Sale
Sakal
RCB for Sale: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही विराट कोहलीची टीम आणि आयपीएलची सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी आहे. RCB आता नवीन मालकांच्या शोधात असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचे माजी बॉस ललित मोदी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चेला आणखी जोर आला आहे. मोदींच्या म्हणण्यानुसार, सध्याचे मालक डायाजिओ पीएलसी (Diageo PLC) यांनी ही टीम विकण्याचा निर्णय घेतला असून मोठ्या ग्लोबल फंड्स आणि सॉवरेन फंड्सशी चर्चा सुरू आहे.