Mukesh Ambani: डिस्नेसोबतच्या करारानंतर मुकेश अंबानींची आणखी एक डील; आता 24 अब्ज रुपयांचा केला करार!

Reliance-Paramount Deal Update : मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज पॅरामाउंट ग्लोबलचा संपूर्ण 13.01% हिस्सा विकत घेत आहे. कंपनीने 14 मार्च रोजी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की 4,286 कोटी रुपये भागभांडवल खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
Reliance-Paramount Deal Update
Reliance-Paramount Deal UpdateSakal

Reliance-Paramount Deal Update: मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज पॅरामाउंट ग्लोबलचा संपूर्ण 13.01% हिस्सा विकत घेत आहे. कंपनीने 14 मार्च रोजी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की 4,286 कोटी रुपये भागभांडवल खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला आहे. पॅरामाउंट ग्लोबलचे दोन उपकंपन्यांद्वारे Viacom18 मध्ये भागभांडवल आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्नेच्या विलीनीकरणाची घोषणा गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारीला झाली होती, त्यानंतरच हा करार झाला आहे. (Reliance Industries to buy out Paramount's 13 percent stake in Viacom18 for 517 million dollar)

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने कंपनीने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की ते भारतातील टीव्ही आणि स्ट्रीमिंग मीडिया मालमत्तांचे विलीनीकरण करणार आहेत. यामुळे मनोरंजन व्यवसायात 70,000 कोटी रुपयांची नवी कंपनी तयार होईल. या संयुक्त उपक्रमाचे काम 2024 किंवा 2025 च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण केले जाईल.

Reliance-Paramount Deal Update
Paytm Layoffs: आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम घेणार मोठा निर्णय; हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी

Viacom18 ही TV18 ब्रॉडकास्टची उपकंपनी आहे. TV18 ब्रॉडकास्टचा कंपनीत 57.48% हिस्सा आहे. व्यवहारानंतर, Viacom18 मधील TV18 ब्रॉडकास्टची हिस्सेदारी 70.49% पर्यंत वाढेल. भारतातील सर्वात मोठे टीव्ही आणि डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी Viacom18 आणि वॉल्ट डिस्नेच्या इंडिया युनिट स्टार इंडियाचे विलीनीकरण करण्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांतील अनेक रिपोर्ट्मध्ये असे म्हटले जात होते की पॅरामाउंट ग्लोबल इंडिया मीडिया जॉइंट व्हेंचरमधील आपला हिस्सा रिलायन्सला विकण्याचा विचार करत आहे.

अंतिम मंजुरी अद्याप देण्यात आलेली नसली तरी अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजला वायकॉम-18 मीडियामधील पॅरामाउंट ग्लोबलचे एकूण स्टेक खरेदी करण्यासाठी एकूण 517 दशलक्ष डॉलर किंवा 42 अब्ज रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागेल.

Reliance-Paramount Deal Update
WPI Inflation: घाऊक महागाई दर 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; काय आहे कारण?

पॅरामाउंट ग्लोबल हिस्सा का विकत आहे?

CBS, Nickelodeon, MTV आणि इतर नेटवर्क चालवणारी दिग्गज कंपनी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी हिस्सा विकण्याचे पाऊल उचलत आहे. मीडिया कंपनीसह, पॅरामाउंट ग्लोबल देखील त्याच्या सायमन आणि शुस्टर पुस्तक प्रकाशन युनिटसारख्या मालमत्ता विकून कर्ज कमी करण्याचा विचार करत आहे. (Reliance Industries shares climb over 1 percent after Paramount Global deal)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com