
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM नंतर शेअर्समध्ये 2% पेक्षा जास्त घसरण झाली, ज्यामुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन 40 हजार कोटींनी कमी झाले.
मुकेश अंबानींच्या नेटवर्थमध्ये 2.43 अब्ज डॉलर्स (21 हजार कोटी रुपये) घट झाली असून एकूण संपत्ती 96.5 अब्ज डॉलर्सवर आली आहे.
तरीही अंबानी जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत 19व्या स्थानावर कायम आहेत.
Reliance Industries AGM 2025 Updates: देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यात जिओच्या IPOचा आणि नव्या वेंचर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या घोषणांनंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल 2.21 टक्क्यांनी कोसळून 1357.05 रुपयांवर बंद झाला. यामुळे कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूएशनमधून तब्बल 40 हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती कमी झाली.