ICICI बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन; कंपनीला बँकिंग क्षेत्रात आणण्याचे दिले जाते श्रेय

Ex-ICICI Bank chairman N Vaghul passes away: ICICI बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल यांचे निधन. त्यांचे वय 88 वर्षे होते. नारायणन वाघुल यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
Renowned banker and ex-ICICI Bank chairman N Vaghul passes away at 88
Renowned banker and ex-ICICI Bank chairman N Vaghul passes away at 88 Sakal
Updated on

Ex-ICICI Bank chairman N Vaghul passes away: ICICI बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल यांचे निधन. त्यांचे वय 88 वर्षे होते. नारायणन वाघुल यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. निवेदनानुसार, GiveIndia चे संस्थापक व्यंकट कृष्णन यांनी सांगितले की, दुपारी 12:38 वाजता त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Renowned banker and ex-ICICI Bank chairman N Vaghul passes away at 88
Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

नारायणन वाघुल यांना आयसीआयसीआय बँकेतील अनेक मोठ्या बदलांचे श्रेय जाते. 1985 मध्ये त्यांनी ICICI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. आयसीआयसीआय बँकेला सार्वजनिक वित्तीय संस्थेतून देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांच्या यादीत नेण्यासाठी वाघुल यांनी मोठे काम केले होते. ICICI ला 1994 मध्ये बँकेचा दर्जा मिळाला.

Renowned banker and ex-ICICI Bank chairman N Vaghul passes away at 88
Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

1996 मध्ये त्यांनी पद सोडले आणि 2009 पर्यंत ते गैर-कार्यकारी अध्यक्षपदावर राहिले.2010 मध्ये, केंद्र सरकारने वाघुल यांना व्यापार आणि उद्योग श्रेणीतील देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले. वाघुल हे बँक ऑफ इंडियाचे सर्वात तरुण अध्यक्षही होते. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांना BOI चे अध्यक्ष बनवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com