Retail Inflation: दसऱ्यापूर्वी सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा; सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर

Retail Inflation Data: किरकोळ महागाई दरात मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Retail inflation falls to three-month low of 5.02 per cent in September
Retail inflation falls to three-month low of 5.02 per cent in September Sakal

Retail Inflation Data For September 2023: किरकोळ महागाई दरात मोठी घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये 6.83 टक्के होता, तो सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आला आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यांच्या महागाई दरातही घट झाली आहे. इकॉनॉमिस्टच्या सर्वेक्षणातही किरकोळ महागाईत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

यापूर्वी जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली होती. सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचा दर आता RBI च्या 6 टक्क्यांच्या पातळीच्या खाली आला आहे, ही दिलासादायक बाब आहे.

सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या महागाई दरात मोठी घट झाली आहे. अन्नधान्य महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 6.56 टक्क्यांवर आला, जो ऑगस्टमध्ये 9.94 टक्के होता. मात्र, तरीही ग्रामीण भागातील जनतेला महागाईने हैराण केले आहे. ग्रामीण भागात किरकोळ महागाई दर 5.33 टक्के आहे, तर अन्नधान्याचा महागाई दर 6.65 टक्के आहे.

Retail inflation falls to three-month low of 5.02 per cent in September
Income Tax: TDS रिटर्न भरणाऱ्यांसाठी आयकर विभागाचा नवा नियम, होणार मोठा बदल

खाद्यपदार्थांच्या किंमतीत घसरण

सप्टेंबर महिन्यात भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे भाज्यांचा महागाई दर ऑगस्टमध्ये 26.14 टक्के होता तो 3.39 टक्क्यांवर आला आहे. मात्र, डाळींच्या भाववाढीचे प्रमाण वाढले आहे. डाळींच्या महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 16.38 टक्के झाला आहे जो ऑगस्टमध्ये 13.04 टक्के होता.

Retail inflation falls to three-month low of 5.02 per cent in September
Hunger Index: जागतिक भूक निर्देशांकात भारताची 111व्या क्रमांकावर घसरण; पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती वाईट

आरबीआयला मोठा दिलासा

किरकोळ महागाईच्या आकडेवारीत मोठी घसरण झाल्याने आरबीआयला मोठा दिलासा मिळाला आहे. महागाईबाबत, RBI ने 6 टक्के अंदाज वर्तवला होता. आरबीआयने महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2024-25 चे ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) चे लक्ष्य 4.5 टक्के ठेवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com