
रोडियम हा जगातील सर्वात महागडा धातू असून त्याची किंमत सोन्या–चांदीपेक्षा कितीतरी जास्त आहे.
तो प्रामुख्याने गाड्यांच्या कॅटलिटिक कन्वर्टरमध्ये आणि दागिन्यांच्या कोटिंगसाठी वापरला जातो.
उपलब्धता कमी आणि मागणी जास्त असल्याने त्याचा दर प्रति ग्रॅम ₹22,000 पेक्षा अधिक पोहोचला आहे.
Most Expensive Metal: आपण नेहमी सोन्या–चांदीच्या किंमतीवर लक्ष ठेवतो. दागिन्यांचा गुंतवणुकीसाठी किंवा लग्नसमारंभात त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, एक असा धातू आहे जो सोन्या–चांदीपेक्षा कितीतरी पटीने महाग आहे. या धातूचे नाव आहे रोडियम (Rhodium). अहवालानुसार रोडियम हा जगातील सर्वात महागडा धातू आहे आणि याची किंमत सोन्यापेक्षा अधिक आहे.