
Rohit Sharma Investment: भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्माने बिझनेसमध्येही आपली नवी इनिंग सुरू केली आहे. सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी प्रोजोमध्ये रोहितने अलीकडेच गुंतवणूक केली आहे.
रोहित शर्माने किती रक्कम गुंतवली याचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही, पण रोहितने यावर प्रतिक्रीया देत सांगितलं की, “प्रोजोमध्ये गुंतवणूक करून मला आनंद झाला आहे. ही कंपनी भारतात उद्योगांची मुळं मजबूत करत आहे.”