
Tata Motors Shares Down: टाटा समूहाची वाहन कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स निफ्टी 50 निर्देशांकात सर्वात वाईट कामगिरी करणारे शेअर्स ठरले आहेत. जुलै 2024 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 1,179 रुपये होती परंतु तेव्हापासून त्यात 44% घसरण झाली आहे. आता त्याची किंमत 661.75 रुपये झाली आहे.
या घसरणीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1.9 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. जग्वार लँड रोव्हर (JLR) ची चीन आणि ब्रिटन सारख्या प्रमुख बाजारपेठेतील कमकुवत मागणी यामुळे ही घसरण आणखी वाढली आहे.