New Rules From 1st May: 1 मे पासून बदलणार पैसे आणि बँकांशी संबंधित नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

New Rules From 1st May 2024: आता मे 2024 सुरू होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत या नवीन महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडर आणि बँकांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत.
New Rules From 1st May 2024
New Rules From 1st May 2024Sakal

New Rules From 1st May 2024: आता मे 2024 सुरू होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत या नवीन महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडर आणि बँकांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. पुढीमहिन्यापासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊया.

एलपीजी सिलेंडरची किमत

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. कंपन्या 14 किलो आणि 19 किलोच्या सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. यासोबतच कंपन्या पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीतही बदल करतात.

येस बँकेचा 'हा' नियम बदलणार आहे

खाजगी क्षेत्रातील येस बँकेच्या वेबसाइटनुसार, 1 मे 2024 पासून बचत खात्यांवरील किमान सरासरी शिल्लक शुल्क (MAB) देखील बदलणार आहेत. बचत खात्याचा प्रो मॅक्स MAB 50,000 रुपये असेल, ज्यावर जास्तीत जास्त 1,000 रुपये शुल्क आकारले जाईल.

बचत खाते Pro Plus, Yes Essence SA आणि YES Respect SA मधील किमान शिल्लक रुपये 25,000 असेल. या खात्यावर कमाल 750 रुपये आकारले जातील. बचत खाते PRO मध्ये किमान 10,000 रुपये शिल्लक असेल. यासाठी 750 रुपये आकारले जातील. हा नियम 1 मे 2024 पासून लागू झाला आहे.

New Rules From 1st May 2024
Jobs in IT: आनंदाची बातमी! आयटी कंपनी देणार 10 हजारांहून अधिक फ्रेशर्सना नोकरी

ICICI बँकेच्या 'या' नियमांमध्ये बदल होणार

ICICI बँकेने बचत खात्यावरील शुल्कातही बदल केले आहेत. 1 मे पासून नवीन शुल्क लागू होणार आहे. बँकेने सांगितले की, आता डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क 200 रुपये करण्यात आले आहे.

मात्र, ग्रामीण भागात हे शुल्क 99 रुपये असेल. याशिवाय 1 मे पासून 25 पाने (पाने) असलेल्या चेकबुकवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यानंतर ग्राहकाला प्रत्येक चेकवर 4 रुपये द्यावे लागतील.

जर ग्राहकाने IMPS द्वारे रकमेचा व्यवहार केला तर त्याला त्यावर शुल्क भरावे लागेल. यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 2.50 ते 15 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क व्यवहाराच्या रकमेवर अवलंबून असणार आहे.

New Rules From 1st May 2024
Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

एचडीएफसी बँक एफडी योजना

HDFC बँकेने सिनियर सिटीझन केअर FD लाँच केली आहे. या FD मध्ये गुंतवणुकीची अंतिम तारीख 10 मे 2024 आहे. या FD वर गुंतवणूकदाराला 0.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. ही एफडी नियमित एफडीपेक्षा खूप वेगळी आहे. 5 ते 10 वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याज दिले जाते. हे व्याज 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com