Passenger Vehicles : प्रवासी वाहनांची घाऊक विक्रीही उच्चांकी

प्रवासी वाहनांनी जानेवारीमध्ये किरकोळ विक्रीप्रमाणे घाऊक विक्रीतही उच्चांक नोंदवला आहे. जानेवारीमध्ये तीन लाख ९३ हजार ७४ वाहनांची घाऊक विक्री झाली असून, यात वार्षिक १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Passenger Vehicles
Passenger Vehiclessakal

मुंबई : प्रवासी वाहनांनी जानेवारीमध्ये किरकोळ विक्रीप्रमाणे घाऊक विक्रीतही उच्चांक नोंदवला आहे. जानेवारीमध्ये तीन लाख ९३ हजार ७४ वाहनांची घाऊक विक्री झाली असून, यात वार्षिक १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात प्रवासी वाहनांनी विक्रमी कामगिरी केली आहे, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा) म्हटले आहे.

जानेवारीमध्ये घाऊक विक्रीत, तीन चाकी वाहनांची संख्या ५३,५३७ आहे, तर चौदा लाख ९५ हजार १८३ दुचाकींची विक्री झाली आहे. ‘प्रवासी वाहनांची जानेवारीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक विक्री झाली असून, तीन-चाकी वाहनांच्या विक्रीत नऊ टक्के वाढ झाली, तर दुचाकी वाहनांनी जानेवारी २०२३ च्या तुलनेत २६ टक्क्यांनी जोरदार वाढ नोंदवली. प्रवासी वाहने आणि तीनचाकी वाहनांनी एप्रिल ते जानेवारी या कालावधीत चालू आर्थिक वर्षात आजपर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे,’’ असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे (सियाम) महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले.

Passenger Vehicles
Passenger Vehicles : सरकारचा मोठा निर्णय, 1 ऑक्टोबर 2024 पासून वाहनांसंबंधित हा नियम होणार लागू; जाणून घ्या

ग्राहकांच्या सकारात्मक भावनांमुळे प्रवासी वाहनांची विक्री वाढली आहे, तर दुचाकी विक्रीही तेजीत आहे. ग्रामीण बाजारपेठेत सुधारणा होत आहे, असे ‘सियाम’चे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले. जानेवारीमध्ये व्यावसायिक वाहन क्षेत्राची वाढ झाली नसली, तरी या आर्थिक वर्षाच्या पुढील दोन महिन्यांत चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल धोरण, सार्वजनिक वाहतूक यामुळे वाहन क्षेत्राच्या वाढीचा वेग कायम राहण्यास मदत होईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

‘सियाम’च्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये प्रवासी वाहनांचे उत्पादन जवळपास दहा टक्क्यांनी वाढले. जानेवारी २०२३ मधील तीन लाख ८० हजार ४८२ वाहनांच्या तुलनेत जानेवारीत ते चार लाख १७ हजार ९४८ आहे. प्रवासी वाहनांची निर्यात मात्र, ११.४ टक्क्यांनी घसरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com