Savings Account: बचत खात्यात किती पैसे ठेवता येतात? काय आहे इन्कम टॅक्सचा नियम

Savings Account: आयकर विभागाला कोणती माहिती द्यावी लागते?
RBI Governor
RBI Governor Sakal

Savings Account Income Tax Rule: आजच्या काळात बँक खाते असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार सोपे होतात. डिजिटल बँकिंगनंतर आर्थिक व्यवहार क्षणार्धात होतात. तुम्ही बचत खाते आणि चालू खाते उघडू शकता.

प्रत्येक खात्याचे स्वतःचे फायदे आहेत. अशा परिस्थितीत, नागरिकांना प्रश्न पडतो की आपण आपल्या बचत खात्यात किती पैसे ठेवू शकतो.

बचत खात्यात किती रोख ठेवावी?

नागरिक आपली बचत बचत खात्यात ठेवतात. या खात्यात किती पैसे जमा करता येतील असा प्रश्न अनेकांना पडतो. या खात्यात पैसे ठेवण्यासाठी मर्यादा नाही.

याचा अर्थ तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवता येतात. तुम्ही एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे की, तुम्ही या खात्यात फक्त तेवढीच रोख ठेवू शकता जी आयटीआरच्या कक्षेत येते. जास्त रोख ठेवल्यास मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो.

RBI Governor
Jio Financial Services: प्रतीक्षा संपली! Jio Fin ची बाजारात एंट्री, BSE वर 'या' किंमतीपासून केली सुरूवात

आयकर विभागाला कोणती माहिती द्यावी?

तुमच्या बचत खात्यावर किती व्याज मिळते याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागेल. तुमच्या बचत खात्यातील ठेवींवर मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि त्याला व्याज म्हणून 10,000 रुपये मिळत असतील, तर त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 10,10,000 रुपये मानले जाते.

RBI Governor
Donald Trump Threat: डोनाल्ड ट्रम्पची थेट भारताला धमकी, 2024 ला पुन्हा निवडून आलो तर...

जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड ठेवली तर तुम्हाला ही माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल. तुम्ही असे न केल्यास आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com