
Direct Benefit Transfer: निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक आश्वासने दिली जातात. राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण (DBT) सारख्या अनेक योजना जाहीर केल्या जातात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एसबीआयचे म्हणणे आहे की अशा योजनांचा बोजा राज्यांच्या बजेटवर पडतो.