

Shark Tank USA: Indian-Origin Designer Gets ₹3.3 Crore Offer for Innovative Measuring Spoon Idea
eSakal
Rahul Agrawal’s Invention Wins a $350,000 Investment Offer: रोजच्या वापरातील एखाद्या छोट्याशा वस्तूला वेगळं रूप देऊन मोठा व्यवसाय उभा करता येऊ शकतो. भारतीय वंशाचे प्रॉडक्ट डिझायनर राहुल अग्रवाल यांनी हेच करून दाखवलं आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चमच्याला त्यांनी नवं डिझाइन दिलं. त्यांच्या या भन्नाट कल्पनेने अमेरिकेतील लोकप्रिय बिझनेस रिअॅलिटी शो ‘Shark Tank USA’ मधील गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या Pollygon Design या स्टार्टअपला सुमारे 3.3 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ऑफर मिळाली.