फसव्या ई-मेलपासून सावधान !

सध्या प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा सीझन सुरू आहे, त्याचा फायदा घेऊन, नुकताच काही लोकांना एक बनावट एसएमएस येत आहे.
Shirish Deshpande writes Beware of fraudulent e-mails cyber crime police Income Tax Refund
Shirish Deshpande writes Beware of fraudulent e-mails cyber crime police Income Tax Refundsakal

- शिरीष देशपांडे

अलीकडेच काही लोकांना प्राप्तिकर (इन्कमटॅक्स रिफंड) परताव्यासाठी दावा न केल्याने, बुडणारी रक्कम पुन्हा मिळवण्यासाठी एक लिंक पाठवून फसवण्याचा प्रयत्न झाला आहे. या फसव्या लिंकद्वारे प्राप्तिकर विभागाच्या बनावट साईटवर नेऊन बँकेची माहिती घेऊन बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे.

त्यामुळे सध्याच्या करविवरणपत्र भरण्याच्या हंगामात अशाप्रकारच्या फसवणुकीचा धोका वाढला आहे.

हे कसे घडते?

सध्या प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा सीझन सुरू आहे, त्याचा फायदा घेऊन, नुकताच काही लोकांना एक बनावट एसएमएस येत आहे. त्यात, ‘तुमचा करपरतावा ३४,२५१ रुपये आहे. तो तुम्ही क्लेम केलेला नाहीत, तो मिळवण्यासाठी दिलेला खातेक्रमांक बरोबर आहे का बघा आणि नसेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.’ असे सांगितले जाते.

Shirish Deshpande writes Beware of fraudulent e-mails cyber crime police Income Tax Refund
Fraud News : सदनिका परस्पर गहाण ठेवून कर्ज घेतल्याप्रकरणी बिल्डरविरुध्द गुन्हा

दिलेली लिंक करविभागाच्या बनावट संकेतस्थळावर घेऊन जाते. त्यातून तुमच्या बँक खात्याची सर्व माहिती घेऊन चोरटे तुमचे बँक खाते पूर्णपणे साफ करू शकतात.

काय काळजी घ्यावी?

  • अशाप्रकारचा एसएमएस, ई-मेल, फोन आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका. तो मोबाईल क्रमांक ब्लॉक करा.

  • माहित नसलेल्या ई-मेल अथवा एसएमएस लिंकवर क्लिक करू नका.

  • प्राप्तिकर विभाग करपरताव्यासाठी (रिफंड) एसएमएसद्वारे अथवा पोर्टलवर कोणतीही माहिती मागवत नाही. विवरणपत्र भरतानाच तुमच्या खात्याची माहिती घेतलेली असते.

  • कोणत्याही व्यक्तीला बँक डिटेल्स, ओटीपी, पिन, आधार क्रमांक, पॅन कार्ड देऊ नका. लागलेच तर, स्वतः बँकेत जाऊन खातरजमा करा, मगच केवायसी कागदपत्रे द्या.

  • अशा फसव्या ई-मेल किंवा एसएमएसच्या नावात स्पेलिंगच्या चुका असल्यास नक्की गडबड आहे, हे लक्षात घ्या.

  • आपण करविवरणपत्र भरत असाल, तर खरेच परतावा मिळण्याची शक्यता आहे का, याची खात्री करा किंवा आपल्या करसल्लागाराचा सल्ला घ्या.

Shirish Deshpande writes Beware of fraudulent e-mails cyber crime police Income Tax Refund
Nashik Fraud Crime: दामदुपटीचे आमिष पडले महागात; 6 महिन्यात तब्बल 55 लाखाला गंडविले

फसवणूक झाल्यास

ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

१९३० या नंबरवर संपर्क साधा. ही यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.

(लेखक सीए असून, सायबर

गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com