
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि रुपयाची डॉलरसमोर घसरण यामुळे चांदीच्या भावात मोठी वाढ झाली.
चांदी 11 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली असून एका दिवसात तब्बल 5,678 रुपयांची वाढ झाली.
औद्योगिक मागणी, जागतिक तणाव व व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे भावात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
Silver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशांतर्गत सराफा बाजारात चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 2.2% वाढून प्रति औंस 40.56 डॉलरवर पोहोचली असून, हा भाव सप्टेंबर 2011 नंतरचा सर्वोच्च आहे.