
चांदीचे भाव 2025 मध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचले असून चांदीने आतापर्यंत 45% परतावा दिला आहे.
औद्योगिक मागणी, भू-राजकीय तणाव आणि मौद्रिक धोरणामुळे चांदीत सातत्याने तेजी दिसत आहे.
तज्ज्ञांचे भाकीत आहे की पुढील काही वर्षांत चांदी सोन्यापेक्षा अधिक परतावा देऊ शकते.
Silver Price Prediction: औद्योगिक मागणीत वाढ आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे. 2025 मध्ये आतापर्यंत (Year-To-Date) चांदीने गुंतवणूकदारांना तब्बल 45% परतावा दिला आहे, जो सोन्याच्या 33% परताव्यापेक्षा जास्त आहे. भारतात चांदीचा भाव आता प्रति किलो ₹1.26 लाखांपर्यंत पोहोचला आहे. जागतिक राजकीय अस्थिरता आणि टॅरिफ अनिश्चिततेमुळे चांदीची मागणी वाढली असून भाव सातत्याने वाढत आहेत.