मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी SIP मध्ये अशी करा गुंतवणूक मिळेल लाखोंचा निधी! संपूर्ण गणित एका क्लिकवर

SIP Investment: तुम्हालाही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर त्यांच्यासाठी आतापासूनच आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.
SIP Investment
SIP InvestmentSakal
Updated on

SIP Investment: सध्या महागाई झपाट्याने वाढत असली तरी लोकांचे उत्पन्न मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. अशा परिस्थितीत लोक आधीच आर्थिक नियोजन करत असतात. अशा स्थितीत पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता असणे स्वाभाविक आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर त्यांच्यासाठी आतापासूनच आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.

तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. या फंडात दर महिन्याला छोटीशी गुंतवणूक केली तर मुलं मोठी होईपर्यंत त्यात लाखोंचा निधी तयार होईल. याच्या मदतीने तुम्हाला मुलांचे शिक्षण, लग्न यासारख्या मोठ्या खर्चासाठी मदत मिळू शकते.

किती गुंतवणूक करावी लागेल?

मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, तुम्ही तुमच्या उत्पन्न आणि बचतीनुसार दरमहा SIP मध्ये ठराविक रक्कम गुंतवू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमचे मूल 20 वर्षांचे होईपर्यंत त्याच्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचा निधी सहज तयार होईल.

तज्ज्ञांच्या मते, एसआयपीत चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळाल्याने दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकते. यामध्ये साधारणपणे 12 टक्के रिटर्न एसआयपीमध्ये मिळतो.

SIP Investment
गरज मानसिकता बदलाची

असे आहे गणित

जर तुम्ही मुलाच्या जन्मासोबत दर महिन्याला 5,000 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ती पुढील 20 वर्षे सुरू ठेवली, तर अशा प्रकारे तुम्ही एकूण 12 लाख रुपयांची गुंतवणूक कराल.

जर तुम्हाला यावर किमान 12% परतावा मिळाला तर 20 वर्षात तुम्हाला एकूण 37,95,740 रुपये व्याज मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही दोन्ही एकत्र पाहिल्यास, तुमच्याकडे मुलांसाठी एकूण 49,95,740 रुपयांचा फंड तयार होईल.

SIP Investment
Reliance AGM 2023: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मिळणार गिफ्ट? आज मुकेश अंबानी करू शकतात 5 मोठ्या घोषणा

गुंतवणूक जास्त, परतावा जास्त

तुम्ही ही गुंतवणूक 20 वर्षांच्या ऐवजी 25 वर्षे सुरू ठेवल्यास, योजना पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकूण 94,88,175 रुपयांचा निधी मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही एवढा मोठा निधी सहज तयार करू शकता जो तुम्हाला इतर कोणत्याही योजनेतून मिळू शकत नाही. येथे SIP वर सरासरी परतावा मोजला आहे. कधी कधी तुम्हाला यापेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो.

SIP Investment
Rozgar Mela: 51 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरी, पंतप्रधानांच्या हस्ते होणार जॉईनिंग लेटरचं वाटप

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com