SpiceJet: स्पाइसजेटच्या सीसीओचा राजीनामा; शेअर्स 10% घसरले, काय आहे प्रकरण?

SpiceJet Share Price: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीला मोठा धक्का बसला आहे. विमान कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. स्पाइसजेटच्या चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अरुण कश्यप यांनी राजीनामा दिला आहे.
SpiceJet shares crash 10 percent after 2 senior executives resign
SpiceJet shares crash 10 percent after 2 senior executives resign Sakal

SpiceJet Share Price: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीला मोठा धक्का बसला आहे. विमान कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. स्पाइसजेटच्या चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अरुण कश्यप यांनी राजीनामा दिला आहे.

हे दोन्ही अधिकारी मिळून नवीन चार्टर एअरलाइन व्यवसाय सुरू करणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या हे दोन्ही अधिकारी स्पाइसजेटमध्ये नोटीस पीरियडवर आहेत, जो 31 मार्च रोजी संपणार आहे. (SpiceJet shares crash 10 percent after 2 senior executives resign)

अरुण कश्यपने यापूर्वी कंपनी सोडली आहे

अरुण कश्यपने 2022 मध्ये स्पाइसजेट सोडली होती. ते एअर इंडियामध्ये चीफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर या पदावर रुजू झाले होते. पण वर्षभरानंतर त्यांनी एअर इंडिया सोडली आणि स्पाइसजेटमध्ये रुजू झाले. कश्यपला जेट एअरवेज आणि ओमान एअरमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.

SpiceJet shares crash 10 percent after 2 senior executives resign
NBFC License: सात NBFC कंपन्या बाजारातून बाहेर; कंपन्यांनी RBIला नोंदणी प्रमाणपत्रे केली परत, काय आहे कारण?

शेअर्समध्ये मोठी घसरण

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. स्पाईसजेटचा शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात 6.82 टक्क्यांनी किंवा 4.13 रुपयांनी घसरून 56.45 रुपयांवर व्यापार झाला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 3,859.67 कोटी रुपयांवर घसरले आहे.

गेल्या एका महिन्यात स्पाइसजेटच्या शेअरची किंमत 11.99 % घसरली आहे. गेल्या 6 महिन्यांत 41.66% आणि एका वर्षात 66.28% परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 77.50 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांचा नीचांक 22.65 रुपये आहे.

विमान कंपनीने आपल्या धोरणात्मक पुनर्रचनेसाठी एक योजना तयार केली आहे. खर्च कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित टिकवून ठेवण्यासाठी सुमारे 1,400 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखली होती.

SpiceJet shares crash 10 percent after 2 senior executives resign
Paytm Payments Bank: 15 मार्चनंतर पेटीएमच्या कोणत्या सेवा होणार बंद? पहा संपूर्ण यादी

स्पाइसजेटने मंगळवारी सांगितले की, विमान कंपनीच्या धोरणात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून त्यांच्या टीममधील अनेक सदस्यांनी राजीनामा दिला आहे. सूत्रांनी सोमवारी सांगितले की एअरलाइनचे मुख्य अधिकारी अरुण कश्यप आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी शिल्पा भाटिया यांनी राजीनामा दिला आहे.

"स्पाईसजेटच्या धोरणात्मक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, मुख्य व्यावसायिक अधिकाऱ्यासह व्यावसायिक टीममधील अनेक सदस्यांनी राजीनामा दिला आहे," असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com