
Pulse Candy Success Story: पान मसाला रजनीगंधा कोणाला माहित नाही? पण याचा मालक कोण आहे माहित आहे का? तर याचा मालक डीएस ग्रुप आहे. पास पास कँडी देखील याच ग्रुपचे उत्पादन आहे. ही दोन्ही उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
पण डीएस ग्रुपचे आणखी एक उत्पादन आहे, ज्यासाठी कंपनीने मार्केटिंग आणि जाहिरातींवर एक पैसाही खर्च केला नाही. तरीही ते उत्पादन इतके प्रसिद्ध झाले की लोकांची मागणी वाढत आहे. आपण ज्या उत्पादनाबद्दल बोलत आहोत ती म्हणजे पल्स कँडी.