Success Story
Success StorySakal

Success Story: मुस्लिम देशातील हिंदू अब्जाधीश, भारतातील एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते कोट्यवधींच्या कंपनीचा मालक

शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी चिट फंड कंपनी सुरू करून व्यवसायात नशीब आजमावले

Success Story: सौदी अरेबियाला जगातील सर्वात श्रीमंत देश म्हटले जाते. कारण इथे अब्जाधीशांची कमतरता नाही. तेलाच्या अफाट साठ्यामुळे या इस्लामी देशात पैशाची कमतरता नाही.

UAE मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतीय डॉ. रवी पिल्लई यांचाही समावेश आहे. डॉ. रवी पिल्लई हे जगभरातील लक्झरी हॉटेल चेनचे मालक आहेत.

विशेष बाब म्हणजे रवी पिल्लई केरळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रविज रिसॉर्ट्स हॉटेल चेनचे मालक आहेत, ज्यांचे केरळमध्ये 5-स्टार रिसॉर्ट्स आहेत.

डॉ. पिल्लई यांच्याकडे द लीला ग्रुप आणि वेलकम हॉटेल्स सारख्या इतर अनेक हॉटेल चेनमध्येही मोठा हिस्सा आहे.

बालपण गरिबीत गेले:

रवी पिल्लई यांनी त्यांची कंपनी आरपी ग्रुप मोठ्या कष्टाने वाढवली आहे. रवी पिल्लई हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. बालपणी त्यांचे आयुष्य गरिबीत आणि संघर्षात गेले, मात्र सर्व अडचणींवर मात करत त्यांनी आपल्या मेहनतीने हे स्थान मिळवले आहे.

डॉ. रवी पिल्लई यांचा जन्म केरळमधील कोल्लम या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी चिट फंड कंपनी सुरू करून व्यवसायात नशीब आजमावले आणि नंतर अब्जावधी डॉलर्सच्या आरपी ग्रुपची स्थापना केली.

Success Story
RBI Penalty: रिझर्व्ह बँकेने फायनान्स कंपनीला ठोठावला 20 लाखांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

दुबईतील सर्वात श्रीमंत हिंदू:

एका फायनान्स कंपनीसोबत आरपी ग्रुप सुरू केल्यानंतर डॉ. रवी पिल्लई यांनी केरळमध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट्सचा व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी हॉटेल ग्रुपचा विस्तार केला. त्यांचा केरळमधील कोल्लम येथे आरपी मॉलही आहे.

DN अहवालानुसार, डॉ. रवी पिल्लई हे दुबईतील सर्वात श्रीमंत हिंदू व्यक्ती मानले जातात आणि त्यांची एकूण संपत्ती 3.2 अब्ज डॉलर आहे, जी 26,364 कोटी रुपये आहे. याशिवाय, त्यांची कंपनी आरपी ग्रुप आणि हॉटेल व्यवसायाचा महसूल 7.8 बिलियन डॉलर (64,245 कोटी रुपये) आहे.

Success Story
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com