
Success Story of Ganesh Bhel: प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे संघर्षाची, मेहनतीची आणि जिद्दीची कहाणी असते. पुण्यातील केशवनगर भागातील संजय मुकुंद माने यांची गोष्ट देखील अशीच प्रेरणादायी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या संजय यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी घेतलेले निर्णय, अपयशातून शिकत पुढे जाण्याची त्यांची जिद्द आणि अखेर ‘जय गणेश भेळ’ नावाने कष्टाने उभारलेला त्यांचा ब्रँड. या सर्व गोष्टी कोणत्याही तरुण उद्योजकासाठी मार्गदर्शक ठरू शकतात.