
Tata Capital IPO
Sakal
Tata Capital IPO: टाटा समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेडच्या (Tata Capital) आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज, म्हणजेच बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत गुंतवणूकदार या बहुचर्चित इश्यूवर बोली लावू शकतात. मात्र, अपेक्षेइतका उत्साह या आयपीओला मिळालेला नाही. दोन दिवसांच्या व्यवहारात हा इश्यू फक्त 75 टक्क्यांपर्यंतच सबस्क्राइब झाला आहे.