Tata Group IPL Title Sponsor
Tata Group IPL Title SponsorSakal

Tata Group: पुढील 5 वर्ष टाटांकडेच राहणार IPLची टायटल स्पॉन्सरशीप, BCCIशी झाली 'इतक्या' कोटींची डील

Tata Group IPL Title Sponsor: आयपीएल 2024 सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि त्याआधी टाटा समूहाने पुन्हा एकदा लीगची टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले आहेत. टाटा समूहाने 2028 पर्यंत टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे.

Tata Group IPL Title Sponsor: आयपीएल 2024 सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि त्याआधी टाटा समूहाने पुन्हा एकदा लीगची टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले आहेत. टाटा समूहाने 2028 पर्यंत टायटल स्पॉन्सरशिप मिळवली आहे.

या कालावधीत टाटा समूह बीसीसीआयला दरवर्षी 500 कोटी रुपये देणार आहे. टाटा समूह बीसीसीआयला पुढील पाच वर्षांसाठी टायटल स्पॉन्सर म्हणून 2,500 कोटी रुपये देणार आहे.

आदित्य बिर्ला समूह देखील आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशीप मिळविण्याच्या शर्यतीत होता, त्यांनीही 2,500 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, शेवटी टाटा समूहाने ही बोली जिंकली.

टाटा समूहाने 2022 मध्ये हे हक्क Vivo कडून बोलीद्वारे जिंकले होते. दरम्यान, ड्रीम 11 ला एका हंगामासाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे हक्कही मिळाले आहेत. यापूर्वी 2008 मध्ये याला पेप्सी आयपीएल असेही म्हटले जात होते. पण आता पुढची पाच वर्षे लोक याला टाटा आयपीएल म्हणताना दिसणार आहेत.

Tata Group IPL Title Sponsor
रिंकू सिंग इंग्लंडविरुद्ध खेळणार; BCCI ने भारतीय संघात केला समावेश, इशानची इथेही 'नो एंट्री'

Vivoला 2018 मध्ये मिळाले हक्क

यापूर्वी 2018 मध्ये विवोने पाच वर्षांसाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळवले होते. यामध्ये 2,199 कोटी रुपयांचा करार झाला होता. पण एका वर्षातच हा करार कोरोनामुळे थांबला. कोविडच्या काळात ड्रीम 11ने आयपीएलच्या एका हंगामासाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवली होती.

Tata Group IPL Title Sponsor
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या उद्‌घाटन सोहळ्यामुळे फटाके बाजारात मोठी उलाढाल

त्यानंतर 2022 मध्ये, जेव्हा भारत आणि चीनमधील वाद वाढला तेव्हा टाटा समूहाने यात उडी घेतली आणि Vivoला 365 कोटी रुपये प्रति हंगाम रक्कम देण्याचा निर्णय घेतला. यानंतर टाटांना आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळाले.

टाटा समूह 2022 पासून आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. 2022 आणि 2023 सीझनसाठी टाटांनी बीसीसीआयला 365 कोटी प्रति सीझन दराने 730 कोटी दिले होते. याआधी आयपीएलचा प्रायोजक विवो होता. या स्मार्टफोन कंपनीने 2022 मध्ये टायटल स्पॉन्सरशिप डीलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com