

N Chandrasekaran Reappointed as Chairman, Why Is Noel Tata Opposing the Decision?
esakal
Chandrasekaran and Noel Tata News: टाटा समूहातील सर्वोच्च नेतृत्वाबाबत सध्या महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. टाटा सन्सच्या बोर्डाने एन. चंद्रशेखरन यांना आणखी एका पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी चेअरमनपदी कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला; मात्र काही वेळातच टाटा ट्रस्ट्सने या निर्णयावर आक्षेप घेत तो फेटाळला.
टाटा ट्रस्ट्सने यासंदर्भात निवेदन जारी करत टाटा सन्सच्या चेअरमनची नियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती यासंबंधी बैठक घेण्यासाठी टाटा ट्रस्ट्सचे दोन्ही नॉमिनी डायरेक्टर्स उपस्थित असणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यांची उपस्थिती नसताना अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर करता येत नाही, असा ट्रस्ट्सचा दावा आहे.