Tata Steel Layoff: टाटा स्टीलचा मोठा निर्णय; कंपनी 800 कर्मचार्‍यांना देणार नारळ, काय आहे कारण?

Tata Steel Layoff: सध्या कंपनीत सुमारे 9,200 कर्मचारी कार्यरत आहेत.
Tata Steel To Layoff 800 Employees In Netherlands To Improve Market Position, Reduce Costs
Tata Steel To Layoff 800 Employees In Netherlands To Improve Market Position, Reduce Costs Sakal

Tata Steel Layoff: टाटा स्टील मोठी कर्मचारी कपात करणार आहे. टाटा स्टीलच्या नेदरलँड युनिटमध्ये ही कपात होणार आहे. कंपनीने 13 नोव्हेंबर रोजी घोषणा केली की ती त्यांच्या IJmuiden प्लांटमधील अंदाजे 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. सध्या येथे सुमारे 9200 कर्मचारी कार्यरत आहेत.

कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बाजारातील स्थिती सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी बरीच काही कारणे आहेत.

Tata Steel To Layoff 800 Employees In Netherlands To Improve Market Position, Reduce Costs
PRS Oberoi Passes Away: ओबेरॉय समूहाचे अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचे निधन; 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कंपनी आपल्या व्यवसायाच्या संरचनेत बदल करत आहे. त्याचा परिणाम व्यवस्थापकीय आणि सपोर्ट स्टाफवर जास्त होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी, स्टील प्लांट अधिक टिकाऊ उत्पादन करण्याचा विचार करत आहे, त्यामुळे कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

Tata Steel To Layoff 800 Employees In Netherlands To Improve Market Position, Reduce Costs
Stock Market Holiday: आज शेअर बाजार राहणार बंद, काय आहे कारण?

नेदरलँड्समधील एकूण कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात टाटांच्या पोलाद कारखान्यांचा वाटा 7 टक्के आहे, ज्यामुळे ते नेदरलँड्समधील सर्वात मोठे प्रदूषक बनले आहे. अशा परिस्थितीत डच सरकारच्या सहकार्याने पोलाद निर्मितीसाठी हरित मार्गाकडे वळण्याची तयारी कंपनीने केली आहे.

मात्र, याबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. टाटा यांनी आपल्या योजनेत 2030 पर्यंत कोळसा आणि लोखंडावर आधारित उत्पादनाची जागा मेटल स्क्रॅप आणि हायड्रोजनवर चालणार्‍या ओव्हनने घेतली असल्याचे सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com